जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक विभाग, पहिली ते तिसरी व चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. या स्नेहसंमेलनात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे विश्वस्त व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे प्रमुख सल्लागार अविनाश रायसोनी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते सरस्वती पुजन करून तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने व गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बोलताना रायसोनी म्हणाले की “रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी यांनी सादर केलेले नाटक, गीते आणी नृत्य यातून जो सर्व धर्म समभाव हा एक मौलिक देशभक्तीपर विचारांची जनजागृती तसेच देशाचा इतिहास व भारतीय संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. हे कार्यक्रमाचे विशेष. आणि ही स्कूल हा संस्कार विद्यार्थ्यांवर पेरत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो” असे म्हणुन त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व स्कूलच्या व्यवस्थापक मंडळाचे कौतुक केले.

यावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी उपस्थित होते. हा कार्यक्रम रिस्पेक्ट, रेसिलियन्स, रिस्पांसिबिलिटी व रिलेशन या चार तत्वांवर आधारित असल्याने संपूर्ण स्नेहसंमेलनात या विषयांवर कलाविष्कार सादर करण्यात आले. तसेच कोरोना काळातील व्यथा, ख्रिसमस व छत्रपती शिवाजी महाराज आदी ऐतिहासिक व सामाजिक प्रश्न नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी वार्षिक अहवालात शाळेचा कला, शैक्षणिक, क्रीडा व स्पर्धा परिक्षेतील गुणवत्ता वाढीचा उंचावत चाललेला आलेख मांडला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांसह आई-वडिलांचा सन्मान व आदर बाळगण्याचे आवाहन करुन उत्कृष्ट व नियोजनबध्दपणे सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले.

तसेच चित्रपट गायक अभिजित व सोनू निगम यांनी गायलेल्या ओम शांती ओम या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.