कजगाव सेंट्रल बँकेचा मनमानी कारभार, तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील कजगाव (Kajgaon) येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी व असभ्य कारभाराची तक्रार कजगाव येथील जीवन प्रभाकर चव्हाण ह्या तरुणाने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कजगाव येथील सेंट्रल बँकेचे कर्मचारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत त्यांची खातेदारांशी वागणूक हीन दर्जाची आहे. कर्मचाऱ्यांच्या आपसातील भांडणांमुळे खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वयोवृद्ध, अपंग, महिला खातेदार, पेंशन धारक हे बँक कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळले आहेत. गावात एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने नागरिकांना ही मनमानी सहन करावी लागत आहे. कुणी जाब विचारला तर कर्मचारी त्यांचे काम करीत नाही. दुपारी बँकेत खातेदारांची गर्दी असताना देखील दिड ते दोन वाजेपर्यंत काम बंद ठेवून लंच ब्रेकच्या नावाखाली कामबंद ठेवून सगळे कर्मचारी एकत्रितपणे जेवण करतात.

वास्तविक बँकेला लंच ब्रेक नसतोच जेवणासाठी एकएक करून जाणे असा नियम असतांना तो पळाला जात नाही. तसेच बँकेची वेळ सकाळी नऊ वाजेची आहे पण बँक कधीच वेळेवर उघडत नाही. कर्मचारी हे मनमर्जीने येतात आणि मनमर्जीने जातात. यामुळे खातेदारांना तासंतास वाट पहावी लागते. नागरिक आजूबाजूच्या खेड्यावरून कुणी चालत तर कुणी रोजंदारी बुडवून येतात. पासबुक प्रिंट करण्याचे मशीन कधी सुरू तर कधी बंद असते असे अनेक आरोप तक्रारदाराने जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या तक्रार अर्जात केला आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकारी बेजबादार व उर्मट वागणुकीबद्दल नेमकी कुठली कारवाई करतात, याकडे आता कजगाव व परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

कठोर कारवाईची मागणी
दरम्यान कजगाव सेंट्रल बँक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध महिला पुरुष व सामान्य नागरिकांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात आहे. अनेकांना वेळोवेळी अपमानित होऊन जावे लागते, यामुळे अनेक खाते बँकेच्या अन्य प्रतिस्पर्धी बँकेकडे गेले आहेत त्यामुळे बँकेतील बेजबादार कारभाराचा फटका आता थेट बँकेला व्यवसायिक मार्गाने बसत आहे. त्यामुळे ह्या बेजबाबदार वागणाऱ्या लोकांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का ? त्यांना पाठीमागे घालण्याचे कारण काय ?त्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

प्रतिक्रिया

सेंट्रल बँकेच्या कारभाराबाबत अत्यंत वाईट अनुभव येत असतो. अनेक खातेदारांना वाईट वागणुकीला सामोरे जावे लागते. अनेक वेळा खातेदारांना अपमानीत व्हावे लागते. बँकेतील कामे अत्यंत संथ गतीने होत असतात, त्यामुळे खातेदारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
जीवन प्रभाकर चव्हाण, तक्रारदार

Leave A Reply

Your email address will not be published.