Thursday, February 2, 2023

भडगावात मराठा समाज वधुवर परिचय मेळावा संपन्न

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा समाजाचा वधुवर परिचय मेळावा मार्केट कमिटी भडगाव पेठ येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या वधुवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर अप्पा पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक संचालिका जनाबाई महाजन, जिल्हा परिषदचे माजी जानकिराम पाटील तसेच मराठा समाजाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरत सोमनाथ, मराठे आजी माजी संचालक, तसेच गुजरात राज्यातील, मध्यप्रदेश, महाराष्ट्राभरातुन व भडगाव, चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जवळपास पाचशे मुला मुलींनी आपला परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडगाव, चाळीसगाव, पाचोरा परिसरातील समाज बांधवांनी सहकार्य केले.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे