जळगावात अल्पवयीन मुलीस पळविले

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील शनिपेठ परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्याक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरात एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने ४ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.