नागरिकांनो सावधान, महावितरणच्या नावाने येताहेत बनावट SMS

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नागपूर : हावितरणच्या नावाने येताहेत बनावट SMS. ‘महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री ९.३० दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत.

अशा प्रकारचे कोणतेही एसएमएस व व्हॉट्सॲप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. अशा मेसेजद्वारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.

काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.