मशाल यात्रेत फ्री-स्टाइल हाणामारी (व्हिडीओ )

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरूच आहे. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली आहेत. यावरुन आता दोन्ही गट एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान जुन्नरमधून एक व्हिडीओ समोर आला आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवेसना आणि ढाल-तलवार चिन्ह दिलं आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे समर्थकांनी अनेक ठिकाणी मशाल यात्रा काढली.  जुन्नरमध्ये या मशाल यात्रेत फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

https://twitter.com/elokshahi/status/1580097963938172930?t=z92STqIo6ci6UXYRuQd8KQ&s=09

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी दुपारी मशाल क्रांतीज्योतीचे स्वागत केले जात होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले आणि मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यात हाणामारी झाली. तालुका प्रमुख दिलीप पवळे आणि अन्य कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून एकमेकाला भिडलेल्या दोघांना बाजूला करून भांडण शांत केलं. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.