पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव : खोटे सौदापावती आणि बनावट करारनामे दाखवून दुकान खरेदी करुन देण्यासाठी भावंडांकडून वेळोवेळी पावणे चार कोटी रुपये घेतले. मात्र ते दुकान दुसऱ्यांना विक्री करुन त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. तसेच बुकींग केलेल्या दुकानांची खरेदी करून न देता व त्यापोटी दिलेली रक्कमही परत न दिल्याने शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५६), अनिल प्रेमचंद साहित्या (वय ४८), ममता अनिल साहित्या (वय ४६) व नितीन खुबचंद साहित्या (वय ३६, सर्व रा. मोहाडी रोड) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणेश नगरात महेंद्र रोशनलाल नाथाणी हे वास्तव्यास असून त्यांचे फुले मार्केटमध्ये कपड्याचे दुकान आहे. महेंद्र नाथानी व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांना दुसऱ्या ठिकाणी दुकान घ्यावयाचे असल्याने त्यांनी एका कार्यक्रमात बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार खुबचंद साहित्या यांनी शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ बांधण्यात येणाऱ्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या जागेचा सातबारा उतारा नाथानी बंधूना दाखविला. तसेच ही जागा मुंबई येथील राजमुद्रा रिअल इस्टेट प्रा. लि.च्या मालकीची असून त्यांनी जागा खरेदीसाठी आपल्या कंपनीसोबत् सौदापावती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साहित्या याठिकाणी व्यापारी संकूल बांधून तेथील दुकाने विक्री करणार असल्याचे सांगितले. यासाठी सौदापावती करारनामा तसेच प्रस्तावित व्यापारी संकुलाचा नकाशा दाखवला

खूबचंद साहित्या यांनी दाखविलेल्या दुकाने हे दोघ नाथानी भावंडांना आवल्याने त्यांनी ते खरेदी करण्याची सहमती दर्शवली. त्यानुसार त्यांनी खूबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या यांची भेट घेतली. त्यांच्यातील व्यवहार ठरवून झालेल्या चर्चेनुसार नाथानी यांनी दि. ५ डिसेंबर २०१७ रोजी के.पी. इन्फ्रास्ट्रक्वरच्या खात्यावर १० लाख रुपये पाठवले. त्यानंतर दोघ नाथानी बंधुंनी वेळोवेळी साहित्या यांना सुमारे ३ कोटी ७३ लाख रुपये दिले आहे.वेळोवेळी पैसे देवून देखील खूबचंद साहित्या हे काहीना काही कारण दाखवून सौदा पावती करुन देण्याचे टाळत होते. त्यानंतर नाथानी यांना राजमुद्रा रिअल इस्टेटचा खुबचंद साहित्या किंवा अन्य तिघांसोबत कुठलाही सौदापावतीचा व्यवहार झालेला नाही. तसचे अनेकांकडून त्यांनी अशाचप्रकारे पैसे घेतले आहे. वारंवार तगादा लावूनही उपयोग होत नसल्याने नाथानी हे दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी साहित्या यांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संस्थेचा शिक्का असलेली तोंडी सौदापावती करारनामा असे अपूर्ण कागदपत्रे दिले होते.

चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल खोटे सौदापावती व बनावट करारनामा दाखवून कमी किंमतीमध्ये दुकाने देण्याचे अमिष दाखवीत खूबचंद साहित्यांसह तिघांनी नाथानी यांच्याकडून वेळोवेळी पावणेचार कोटी रुपये घेतले. व्यवहार पूर्ण करून दुकाने खरेदी करुन मिळत नाही व रक्कमही परत मिळत नसल्याने नाथानी यांनी शनिवार दि. २ मार्च रोजी रात्री शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायीक खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.