दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतेरा लाखांचा गंडा

0

मुक्ताईनगर;- एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिश दाखवून मी कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून तरुणाला साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फकिरा अर्जुन सावकारे (वय-२५रा. भोकरी ता. मुक्ताईनगर) परिवारासह उदरनिर्वाह करीत असून त्याने बारावी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलय जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखवून १३ लाख ५० हजारात फसविले.

फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली १३ लाख ५० हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.