फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा व्हिडिओ व्हायरल… (व्हिडिओ)

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सोशल मीडियावर फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सना मरीन आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डान्स करताना आणि गाणं म्हणताना दिसत आहेत. व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या आहेत.

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन (Sanna Marin) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. फिनलँडच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान सना मरीन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावर त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन यात फरक आहे, ही आपली वैयक्तिक बाब असल्याचं स्पष्टीकरणही सना मरीन यांनी दिली आहे. माझा काही वेळ मी मित्र-मैत्रिणींबरोबर घालवू शकते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

फिनलँडच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान सना मरीन यांच्या ड्रग्स चाचणीचीही मागणी केली आहे. पार्टीत डान्स आणि गाणं म्हटल्याचं फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी मान्य केलं आहे. पण सर्व पूर्णपणे कायदेशीर गोष्टी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ड्रग्स सेवनाच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे. आपण कधीही ड्रग्स घेतलं नाही आणि अशा कोणालाही ओळखतही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जर्मन वृत्तवाहिनी बिल्डने साना मरीनला जगातील सर्वात कूल पंतप्रधान म्हणून घोषित केलं आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. आरोप झाल्यानंतर सना मरीन यांनी आपल्या वागण्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही, मी नेहमी आहे तशीच राहिन असं उत्तर विरोधकांना दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.