महिलेच्या बँक खात्यातून सव्वा तीन लाख काढून फसवणूक

0

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क

३८ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने एटीएम आणि चेकबुकच्या माध्यमातून परस्पर ३ लाख १९ हजार ५१६ रूपये काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील उत्राण येथे समोर आला आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील ३८ वर्षीय महिला यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. २७ मार्च रोजी महिला ह्या बँकेत जावून चेकबुक संदर्भात विचारणा केली.त्यावेळी बँक मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. १ मार्च रोजी महिलेचे चेकबुक आणि एटीएम कार्ड हे कुरीअर वाल्याने बँकेचा अकाऊंटला लिंक असलेल्या फिर्यादीचा जुना मोबाईल क्रमांकावर फोन करून चेकबुक आणि एटीएम पाठवून दिले. याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने एटीएमच्या मदतीने २१ मार्च ते २४ मार्च दरम्यान बँकेच्या खात्यातून परस्पर ३ लाख १९ हजार ५१६ रूपयांची रक्कम काढून घेते. ही बाबत लक्षात आल्यानंतर महिलेने कासोदा पोलीस ठज्ञण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.