फेस मास्क लावतांना ‘या’ चुकांमुळे होऊ शकते नुकसान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपला चेहरा सुंदर दिसावा आणि तो चमकदार व नितळ व्हावा असे सगळ्यानांच वाटत असत. मग त्यासाठी आपण बरेच उपाय बघत असतो. सोशल मीडियावर पाहत असतो किंवा कोणीतरी त्याबाबत आपल्याला काही घरगुती उपायदेखील सुचवत असतात. चमकदार आणि स्वच्छ त्वचेसाठी चेहऱ्यावर अनेक प्रकारचे फेस मास्क लावले जातात.

चेहरा न धुणे
फेसमास्क लावण्यापूर्वी नेहमी हात आणि चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल, घाण साफ होते. अन्यथा त्वचेला फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत चांगले परिणाम मिळविण्यासाठी प्रथम हात आणि चेहरा धुवा. फेसमास्क नेहमी स्वच्छ त्वचेवर लावा.

अतिवापर करणे
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचा असतो. हाच नियम फेसपॅकसाठीही लागू पडतो. जर तुम्ही दररोज फेसपॅकचा वापर केलात, तर त्वचेचा कोरडेपणा वाढणे, चेहरा लाल होणे यांसारखे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

फेसमास्क जास्त काळ त्वचेवर ठेऊ नका
बरेच लोक फेस मास्क लावल्यानंतर बराच वेळ तसेच ठेवतात. हे हानिकारक असू शकते. यामध्ये अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्या तुमच्या त्वचेला नुकसान देऊ शकतात. यासाठी, फेस मास्क लावण्यापूर्वी, त्याच्या पॅकेजिंगची मागील बाजू नीट तपासून घ्या आणि दिलेल्या सूचनांचे पालन करा.

Leave A Reply

Your email address will not be published.