सोमवारी राज्यातील बाजार समित्यांचा ‘एक दिवसीय बंद’, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पणन कायद्यात दुरुस्ती विरोधात येत्या २६ फेब्रुवारीला राज्यातील बाजार समित्या एक दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीत एक दिवसीय बंद असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करणे, तसेच आडते, हमाल-मापारी आधी घटकांविरोधात राज्य शासनाने पणन कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल-मापारी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं. असं बाजार समित्यांचे म्हणणं आहे.

त्यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिकसह राज्यातील सर्व बाजार समिती सोमवारी (दि. 26) रोजी बंद असणार आहे. सरकारने पणन कायद्यात दुरुस्त्यांसंबंधी 23 फेब्रुवारीपर्यंत सूचना, हरकती मागविल्या आहेत.

कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील प्रस्तावित बदल होऊ नये, 2018चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वय सुरू असलेले बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.