निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आदेश

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे मुख्य निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याबाबत मागणी केली होती. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मनसेची मागणी मान्य केली आहे. अमित ठाकरे यांनी याबाबत फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मात्र, शाळांचे कामकाज वगळता, शिक्षकांना काम द्यायला हरकत नाही कारण हे राष्ट्रीय काम आहे. अशी भूमिका देखील निवडणूक आयोगाने घेतली.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं?
सेंट मेरि स्कूल व इतर या न्यायालयीन प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचा-यांना केवळ रजेच्या दिवशी, शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम देता येईल.

उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ३३५/२०१३ (S.P. R. J. Kanya Shala Trust Vs. ECI) या न्यायालयीन प्रकरणात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १५९ अन्वये उपलब्ध करून द्यावयाच्या कर्मचारी वर्गासंदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यानुसार खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळेतील, शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष निवडणूकीच्या कालावधीत ०३ दिवस प्रशिक्षणाकरिता व ०२ दिवस मतदानाच्या दिवसाकरिता उपलब्ध करुन देण्याबाबतची तरतूद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.