चाळीसगाव : –पिंप्री प्र. दे. येथील शेतकरी रघुनाथ मांगो पाटील यांच्या शेतात बांधलेल्या वासराचा बिबट्याने फाडशा पाडला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्याचवेळी बाजूच्या मुख्य रस्त्यावर वाहन आले. त्यामुळे या बिबट्याने पळ काढला. गत पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच शिवारात एका मादीने दोन बछड्यांना जन्म दिला होता.
तेव्हापासून या शिवारात अनेक मुक्या प्राण्यांचा जीव गेल्याने शिवारात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस आधी बिबट्याच्या हल्ल्यात हरिण आणि तीन मोरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे कर्मचारी ललित पाटील व संजय गायकवाड यांनी पंचनामा केला.