जळगाव : घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातून मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी सोनपोत लांबवल्याची घटना दि. १३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काशीनाथ चौफुलीजवळ घडली होती. याप्रकरणी सोनपोत चोरणाऱ्या दोघ रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांच्या तांबापूरा परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनीतील खुशी प्रवीण महाजन या दि. १३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या आई लताबाई सखाराम पाटील यांना घेवून दुचाकीने अजिंठा चौफुलीकडून सुप्रिम कॉलनीकडे जात होत्या. महामार्गावरील काशीनाथ चौफुली जवळील पेट्रोल पंपाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्या इसमाने दुचाकी चालविणाऱ्या खुशी महाजन यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोनपोत जबरदस्तीने चोरुन नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूशी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनपोत चोरणारे दोन अज्ञात इसम हे तांबापुरा परीसराकडे पळून गेल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.खाक्या दाखवताच दिली गुन्ह्याची कबुली गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सोनपोत चोरणाऱ्या दोघ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तांबापुरा परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली. त्यांना अटक केल्यानंतर न्या. जी. आर. कोलते यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार तर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.. सहा तासात चोरटे जेरबंद सोनपोत लांबवल्याची घटना घडल्यानंतर सहा तासाच्या आत एमआयडीसी पोलिसांनी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या तरुणाविरुद्ध खुन करणे, जबरी चोरी करणे, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दत्तात्रय पोटे, पोउपनि निलेश गोसावी, सफौ अतुल वंजारी, किरण पाटील, किशोर पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे, राहुल रगडे, छगन तायडे, योगेश बारी, राहुल पाटील यांच्या पथकाने अटक केली.