मुंबई ;- जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी कॅन्सर, नंतर तुरुंगवास आणि आता मोठ्या कष्टाने त्यांना जामीन मिळाला होता आणि आता पत्नीच्या निधनामुळे नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
गुरुवारी सकाळी जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले. या महिन्याच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी त्यांच्या पत्नीसोबत राहण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता.
गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल हे दोघेही कर्करोगाने ग्रस्त असल्याने वैद्यकीय आणि मानवी दृष्टीकोनाच्या आधारावर त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता.