वाहनाच्या कॅरीला दोर बांधून चालकाची आत्महत्या

0

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क

एरंडोल येथील तरुणाने आपल्या वाहनाच्या कॅरीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील वृंदावननगर मधील रहिवासी योगेश शांताराम देशमुख (वय ३४) या तरुणाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील  एमएसईबीऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या स्वतःच्या मालकीची टाटा मॅजिक गाडीवरील कॅरीला दोर बांधून गळफास घेतला आहे. दरम्यान योगेश देशमुख हा खाजगी वाहन चालक असून त्याने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते त्यातच शासनाच्या एसटीमध्ये महिलांना सवलत मिळाल्याने खाजगी वाहन चालवणे जिकरीचे झाले होते. त्यातच तो कर्ज फेडू शकत नव्हता. म्हणून आर्थिक विवंचनेत असल्याची चर्चा असुन बहुतेक या कारणामुळेच त्याने आत्महत्या केली असावी अशी देखील चर्चा आहे.

योगेशच्या मृत्यूनंतर त्याला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. योगेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, विधवा बहिण असा परिवार आहे. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला विकास वसंत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील, विलास पाटील, जुबेर खाटीक, रवींद्र ताडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.