एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले; एका विरुद्ध गुन्हा

0

एरंडोल;-तालुक्यातील एका गावातून एका 17 वर्षीय मुलीला एकाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून एका विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्ष 11 महिन्याच्या मुलीला संशयित शिवाजी हिम्मत पाटील राहणार पिंपरी प्र. चा. ता. एरंडोल याने ३ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुलीच्या घरातून तिला पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून ७ ऑगस्ट 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय शरद बागल करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.