लोहारा रस्त्यालगत बिबट्याचा मुक्तसंचार… शेतकऱ्यांसह गावकऱ्यांमध्ये भीती..

0

 

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरसाळा येथे हनुमान दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लोहारा-जामनेर रस्त्यालगत आज दि.१५ रोजी पहाटे ५ वाजता शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सुभाष हिरालाल जाधव हे त्यांच्या मित्रांसह शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनाला वाहनाने लोहारा-जामनेर रस्त्याने जात असतांना जलालशाह बाबा दर्ग्याच्या पुढे शेताजवळील रस्त्यालगत वाहनाच्या लाईट मध्ये बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने, परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या परिसरात कापूस वेचणीची कामे सुरू आहेत, कापाशीचे पीक तोडणीला असल्याने शेतकरी व मजूरांचा या बिबट्याच्या मुक्त संचार असल्याने जीव टांगणीला आला आहे. त्यामुळे वनविभाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.