Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथराव खडसे यांच्या निवडीचा जल्लोष
    जळगाव

    विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथराव खडसे यांच्या निवडीचा जल्लोष

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 10, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विधान परिषदेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे यांची गटनेते पदी निवड व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार , प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटिल , विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिफारस केलेली होती. एकनाथराव खडसे यांना विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असून ते ज्येष्ठ नेते आहेत यामुळे निश्चितपणे त्यांच्या आक्रमक वकृत्व शैली व कार्यपद्धतीचा पक्षासाठी योग्य उपयोग होईल व नागरिकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागतील अशी खात्री असल्यामुळे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून व नाथाभाऊंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. एकनाथराव खडसे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात त्यामुळे त्यांची घटनेचे पदी नियुक्ती झाली असल्याने कार्यकर्त्यांना पाठबळ मिळेल असे भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या .
    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , रिकू चौधरी , राजू मोरे , अमोल कोल्हे , इब्राहिम तडवी , रमेश बहारे , दिलीप पवार , रमेश पाटील , रहीम तडवी, जितेंद्र चांगरे , विशाल देशमुख , ललित नारखेडे , साहिल पटेल , राहुल टोके , सचिन साळुंखे , कुंदन सूर्यवंशी , भाला तडवी , चेतन पवार , योगेश साळी , भुमेश निंबाळकर , हितेश जावळे , नितिन जाधव , सतीश चव्हाण , शैलेश अभंगे ,राजेंद्र भंगाळे , भीमराव सोनवणे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

     

     

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif