लोकशाही संपादकीय लेख
केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण, चौपदरीकरण चे सहा पदरीकरण, रस्ते खराब होऊ नये म्हणून डांबर ऐवजी सिमेंटचे रस्ते, वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध ठिकाणी फ्लाय ओवर तयार केले जात आहेत. त्यासाठी हे सर्व रस्ते बीओटी तत्त्वावर केली जात असल्याने प्रत्येक ६० किलोमीटर अंतरावर टोलनाका उभारून तेथे वाहनधारकांकडून टॅक्स वसूल केला जातो. धुळे ते जळगाव दरम्यान महामार्ग क्रमांक ५३ चे चौपदरीकरणाचे काम जवळजवळ ९० % पूर्ण झाले असल्याने धुळे पारोळा दरम्यान सबगव्हाण येथे कंत्राट दाराने टोल नाका उभारून तेथे समोर दिनांक ११ पासून वाहनधारकांकडून वसुली सुरू केली जाणार होती. परंतु त्या आधीच रविवारी मध्यरात्री ४ बुरखादारी व्यक्तींनी धुळ्याकडून विना नंबर प्लेटच्या कार मध्ये येऊन टोल नाक्यावरील दोन केबिनची तोडफोड करून स्फोटक पदार्थ टाकून पेटवून दिले आणि प्रसार झाले. तोडफोड करणाऱ्यांचा हेतू पैशाने लूट करण्याचा नव्हता हे स्पष्ट आहे. कारण सबगव्हाण टोल नाक्यावर सोमवारी वसुली सुरू होण्या होणार होती. त्यामुळे वसुली नसल्याने पैशांची रोकड असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ९ मार्च बरोबर अलीकडे ऑनलाईन फास्टट्रॅक ने वसुली मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अशा टोल नाक्यावर वसुली करणाऱ्यांकडे मोठे रक्कम असू शकत नाही. परंतु वसुली सुरू होण्याआधीच टोलनाक्याची तोडफोड करण्याचा वेगळेच उद्देश असल्याचे दिसून येते. तोडफोड व जाळपोळीची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असल्याने पोलीस तसा तपास करतीलच. परंतु केवळ तोडफोड व जाळपोळ करून प्रसार होणाऱ्यांना नेमका कोणता इशारा द्यायचा आहे, या कारणाचा शोध घेणे गरजेचे आहे. येत्या दोन-तीन दिवसात तोडफोड केलेल्या केबिनची पुन्हा उभारणी केली जाईल असे ऍग्रोव्ह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व्यवस्थापक गौतम दत्ता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तोडफोड केलेल्या सबगव्हाण टोल नाक्यावरील वसुली बंद होणे शक्य नाही. तसेच आता तिथे टोलनाका संरक्षणासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. तेव्हा आता गाफील असताना तोडफोड करणे या वाहनधारकांना सहज शक्य झाले ते आता पुढे पोलिसांच्या संरक्षण करण्याने होणार नाही. अशा प्रकारामुळे टोल नाक्यावर वसुली बंद होईल असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे की, चांगले रस्ते हवे असतील तर टोल टॅक्स द्यावाच लागेल. त्यापुढे त्यामुळे टोल नाक्यावर वसुली सुरू होण्याआधीच तोडफोडेने दहशत निर्माण करण्याने टोलनाका बंद होईल हे कदाबी शक्य नाही, हे तोडफोडीचे कृत्य करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे..
धुळे जळगाव या महामार्ग लगत चौपदरीकरणाचे काम निहित वेळेत झाले नाही हे बरोबर आहे. त्यामुळे धुळे जळगाव दरम्यान प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला हेही खरे आहे. तसेच महामार्गावर कंत्राटदारांकडून ज्या सुख सोय उपलब्ध करून घ्यायच्या आहेत त्याचीही अद्याप पूर्णता झालेली नाही हेही मान्य आहे. तथापि त्यासाठी कायदा हातात घेऊन असे माथेफिरू कृत्य करणे अशोभनीय आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे. त्या सुसंस्कृत राज्यात असे बेकायदेशीर कृत्ये डोके काढत असतील तर ते योग्य नाही. शासनाने याची दखल घेऊन पोलिसांना मार्फत योग्य आणि खडक कारवाई करावी पारोळापासून सबगव्हाण टोलनाका १२ किलोमीटर अंतरावर असून या नाक्यापासून ४ किलोमीटर अंतरावर धुळे जिल्ह्यातील मुक्ती हे मोठे गाव आहे. सबगव्हाणच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर पारोळा तालुक्यातील दळवेल हे गाव असून दळवेल गावचा तर रोजचा व्यवहार धुळे जिल्ह्यातील मुकटी या गावाशी मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे चार चाकी वाहनांची दळवेलहून मुकटी गावाला जातात आणि येतात आता टोलमुळे जायचे ८० रुपये आणि यायचे ८० रुपये असा पैशांचा भुर्दंड पडतो आहे. त्यामुळे काही माथेफिरूंनी हे कृत्य केले असावे काय? परंतु लोकल जिल्ह्यातील लोकांना टोल नाक्यावर वाहनांचा पास दिला जातो. अत्यंत कमी पैशात महिनाभर त्यांची वाहने जाऊ येऊ शकतात. परंतु याची माहिती नसल्याने अज्ञातांकडून हे कृत्य केले असेल तर त्याच्या मागे फार मोठे षडयंत्र नाही असे म्हणता येईल. परंतु सिनेमा स्टाईलने टोलनाकेची तोडफोड झाली असल्याने हे एक ठरवून केलेले आणि अज्ञात शक्तीचा हात असल्याचे म्हणता येईल. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून अंदाज अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाले आहे. तोडफोड करणाऱ्यांचा शोध पारोळा पोलीस घेत आहेत. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने पोलीस गुन्हेगारांना शोधून काढतील. परंतु लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना दराने त्याला राजकारणाचा वास येतोय का, याचाही शोध घेणे गरजेचे आहे…!