गृहिणींसाठी महत्वाची बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. खाद्य तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच पावलं उचलली होती. त्यामुळे या वर्षात खाद्य तेलाने ग्राहकांचा खिसा कापला नाही. केंद्र सरकारने यापूर्वीच आयात शुल्क कपात केले होते. आता नवीन निर्णयानुसार, आयात शुल्कातील ही कपात मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मार्च २०२४ मध्ये ही मुदत संपणार होती. या निर्णयामुळे नागरिकांना आता पुढील १५ महिन्यापर्यंत स्वस्त खाद्यतेल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात राहतील. सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार नाही.

इतके कमी झाले आयात शुल्क
केंद्रीय अर्थमंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेल यावरील आयात शुल्क १७.५% हुन कमी होऊन ते १२.५% वर आणण्यात आले आहे. दरातील ही कपात मार्च २०२५ पर्यंत लागू असेल. आयात शुल्क कमी झाल्याने हे तेल देशात येण्याचा खर्च कमी होईल. आयात शुल्क हे कोणत्याही वास्तूच्या किमतीबाबत महत्वाची भीमीक बजावते.

Leave A Reply

Your email address will not be published.