जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या लगीनसराईचा हंगाम सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर याच दरम्यान सोन्यासह चांदीने उसळी घेतली.
जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे दर 62,990 रुपये असून चांदीचे दर ₹75,300 रुपये आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी संध्याकाळी 7.20 वाजता सोन्याचा भाव 1.04 टक्क्यांच्या वाढीसह 63150 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे.
त्याच वेळी, एमसीएक्सवर चांदीची किंमत 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 75866 रुपये प्रति किलो आहे. दरवाढीने देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव 63 हजारावर गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही ७७ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.