अंड्याशिवाय बनवा खजूर आणि अक्रोडाचा केक

0

खाद्यसंस्कृती विशेष

 

साहित्य: 

३/४ कप मैदा, १/२ कप खजूराचे तुकडे, १/४ कप पाणी (खजूर भिजवण्यासाठी), १/४ कप अक्रोडाचे तुकडे, कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून), ४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड) वितळवून, १ टिस्पून बेकिंग सोडा, १/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून वेनिला इसेंस

 

कृती:

१) १/४ कप कोमट पाण्यात खजूराचे तुकडे साधारण ३० मिनीटे भिजवून ठेवावे. नंतर खजूर पाण्यातून काढावे, बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना भिजवायला वापरलेले पाणी वापरावे.

२) ओव्हन ३२५  (१६० C) वर ५ मिनिटं प्रिहीट करावे.

३) मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून २ ते ३ वेळा चाळून घ्यावे, यामुळे तिन्ही जिन्नस छान मिक्स होतील आणि गुठळ्या राहणार नाहीत.

४) दुसर्‍या एका भांड्यात कन्डेन्स मिल्क, वितळवलेले बटर आणि वेनिला इसेंस घालून मिक्स करावे.

५) मैद्याचे मिश्रण घालून गुठळ्या न होता फेटून घ्यावे.

६) नंतर त्यात खजूराची पेस्ट आणि अक्रोडाचे तुकडे घालून मिक्स करावे.

७) केक टिनला आतून बटरने ग्रिस करावे म्हणजे केक बेक झाला की भांड्याला चिकटणार नाही.

८) केकसाठीचे मिश्रण भांड्यात ओतावे आणि वरून चमच्याने एकसारखे करावे.

९) प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर केकचे भांडे ठेवावे आणि ४५ मिनीटे १८०° बेक करावे.

१०) ४५ मिनीटांनी ओव्हन बंद करावे, पण भांडे लगेच बाहेर काढू नये. ५ मिनीटांनी बाहेर काढावे.

११) ५ मिनीटांनी भांडे ओव्हनच्या बाहेर काढावे आणि जाळीच्या रॅकवर काढून ठेवावे आणि गार होवू द्यावे.

१२) केक गार झाला कि सावकाशपणे भांड्यातून बाहेर काढावा. कापण्यापूर्वी केक पूर्ण गार झाला पाहिजे. १/२ इंचाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवावा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.