अर्जुन खोतकरांवर EDची मोठी कारवाई

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात राजकीय वातावरण रंगले असतांना शिवसेनेच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेत अनिल परब यांची चौकशी ईडी करत आहे.  यादरम्यान आता अर्जुन खोतकर यांच्यावर देखील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

जालना येथील साखर कारखान्यावर ईडीने धाड टाकली आहे. या कारवाईत कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत, कारखान्याची यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर संचालक असलेला हा कारखाना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. PMLA अंतर्गत सावरगाव हडप, तालुका आणि जिल्हा जालना येथील जालना सहकारी साखर कारखाना लि.ची जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील घर, कार्यालय यावर ईडीने छापा टाकला होता, तसेच या व्यवहाराशी संबंधीत एका बिल्डरावर औरंगबाद येथे आणि कारखान्याचे मालक यांच्यावर छापेमारी केली होती, त्यानंतर ईडीने जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री संलग्नित करण्याचा निर्णय घेतला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.