मुंबईच्या झवेरी बाजारात तोतया ईडी अधिकाऱ्यांची धाड ; लाखो लुटले !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा अक्षय कुमार अभिनित स्पेशल २६ हा बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवून सराफ व्यापाऱ्यांना लुटत असल्याची कथा प्रसिद्ध आहे. या कथेसारखी रिअल घटना आता समोर आली असून बनावट ईडीडचे अधिकारी बनून आलेल्या पथकाने एका सराफ व्यावसायिकाचे लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे मुंबईत प्रचंड खळबळ उडाली असून यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर चार अज्ञात व्यक्तींनी छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही बेड्या घातल्या. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि तीन किलो सोने चोरुन नेले.

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.