नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी पथके घोषित

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ अमन मित्तल यांनी या निवडणूकीसाठी व्हिडीओ देखरेख पथक (Video Surveillance Team) भरारी पथक (Flying Squad) तसेच क्षेत्रीय अधिकारी (Zonal officer) यांची नियुक्ती केली आहे.

त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी नियुक्त केलेले भरारी पथक (FIying Squad) व व्हिडीओ देखरेख पथक (Video Surveillance Team) यांच्या प्रमुखांना शासन अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून निवडणूक कालावधीपर्यंत तसेच क्षेत्रीय अधिकारी (Zonal officer) (विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार बहाल नाहीत असे अधिकारी) यांना दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपासून ते दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 129, 133. 143 व 144 अन्वये शक्ती प्रदान केल्या आहेत. असेही जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.