जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवली पर्यावरणपूरक “पॅराबोलिक सौर चूल”

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिवसेंदिवस वाढणाऱ्या एलपीजीच्या किमतींमुळे अनेक घराचं बजेट बिघडत चाललं आहे. वाढणाऱ्या गॅसच्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यातून सुटका करण्यासाठी जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट (GH Raisoni Institute of Engineering and Business Management) महाविद्यालयाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी नवा पर्याय समोर आणला असून या सेंटरचे विध्यार्थी नवीन सौर चूलीवर काम करत आहेत. या सौर चूलीला “पॅराबोलिक सौर चूल” असं नाव देण्यात आले आहे. (Eco-Friendly “Parabolic Solar Stove” made by students of GH Raisoni College)

ग्राहक ज्यावेळी ही सौर चूल खरेदी करायला जाईल, फक्त त्याच वेळी त्याला मोजके पैसे मोजावे लागतील, परंतु त्यानंतर मात्र कोणताही खर्च ग्राहकाला करावा लागणार नाही. देखभाल आणि महिन्याचा कोणताही अतिरिक्त खर्च करावा त्याला लागणार नाही. ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त तापमानाची आवश्‍यकता असते, त्याकरिता पॅराबोलिक सौर चुलीचा वापर होतो. यामध्ये एकाच वेळेला ५ ते ७ माणसांचे अन्न ४० ते ४५ मिनिटांत शिजविले जाते. त्यामुळे या कुकरच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळेत बनविणे शक्य आहे. वापरण्यास अत्यंत सोपा व कोठेही वाहून नेता येणारा असा हा बहुपयोगी कुकर असून, यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थसुद्धा करता येतात. यामध्ये आपला नेहमी वापरातला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजवता येते. इंधनाची बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास हा कुकर मदत करतो. चांगल्या सूर्यप्रकाशात एक तासामध्ये अन्न शिजवू शकतो. हाताळण्यास आणि स्वच्छ करण्यास अगदी सोपा आहे. टिकाऊ, सुरक्षित व अधिक कार्यक्षम असून ऊन असेपर्यंत दिवसातून या कुकरला कितीही वेळा वापरता येते.

या प्रकल्पाचे संपूर्णतः समन्वय इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. मुकुंद पाटील व विद्यार्थ्यांनी साधले तर भविष्यात सामान्य जनतेसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी विध्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करतांना नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.