पृथ्वीवर होणार २५ तासांचा दिवस

0

म्युनिक : जगभरात सध्या २४ तासांचा दिवस आहे. परंतु भविष्यात तो २५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता ‘टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक’ (टीयूएम) च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हा बदल पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची प्रगती दर्शवणारा असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे.

टीयूएमचे वेधशाळा प्रकल्प प्रमुख, उलरिच श्रेइबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिभ्रमण प्रक्रियेतील चढ-उतार हे केवळ खगोलशास्त्रासाठीच महत्त्वाचे नसून अचूक

हवामान मॉडेल तयार करण्यात आणि अल निनोसारख्या गंभीर घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासही मदत करतात. याविषयीची माहिती जितकी अचूक, तितकी शैली अधिक अचूक अंदाज बांधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. टीयूएममध्ये रिंग लेसर नेव्हिगेशन उपकरण पृथ्वीचे परिभ्रमण अचूकतेने मोजण्यास सक्षम असून पृथ्वीच्या रोजच्या परिभ्रमणातील लहान बदलही ते नोंदवू शकते. जिओडेटिक ऑब्झव्हेंटरी वेटझेलमधील उपकरण म्हणजेच लेझर रिंग जायरोस्कोपच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी

जमिनीच्या २० फूट खालील दाब प्रणालीद्वारे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होणार फरक नोंदवण्यात आला असून त्याच माध्यमातून येणाऱ्या काळात पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, डायनासोरच्या काळात पृथ्वीवर २३ तासांचा दिवस होता, तर १.४ अब्ज वर्षांपूर्वी, एक दिवस १८ तास ४१ मिनिटांचा होता. तर भविष्यात दोनशे दशलक्ष वर्षांनंतर एक दिवस तब्बल २५ तासांचा होणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.