मंडळ अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या मुजोर डंपर चालकावर गुन्हा दाखल…

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यावल तालुक्यातील साखळी मंडळ अधिकारी आपल्या पथकासह डांभुर्णी गावाच्या बस स्थानकावर गस्तीसाठी असतांना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार दि. 13 ऑक्टोबर रोजी रात्री घडला होता. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखळी येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप दि.13 ऑक्टोबर रोजी कोतवाल विशाल उज्जैन सिंग राजपूत व गणेश लक्ष्मण महाजन तसेच भरारी पथकासह डांभुर्णी येथील बस स्थानकाजवळ उभे होते. बस स्थानकावरून अवैध वाळू वाहतूक संबंधी कारवाई सुरू होती. यादरम्यान जळगाव कडून विनाक्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे केबिन व आकाशी रंगाची ट्राली असलेले डंपर डांभुर्णी गावाकडे येत असताना त्यांनी ते थांबवून त्याला परवाना बाबत विचारपूस केली. मात्र त्याने उत्तर न देता मंडळ अधिकारी यांना शिवीगाळ केली. आणि ‘तुम्हाला माझे डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही’ अशी मुजोरी करत धक्का मारून सदर वाहन पळवून नेले. यावल पोलिसात महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून त्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.