शाहापुर जवळ भिषण अपघात; ड्रायव्हर सहित ४ विद्यार्थिनी ठार…

0

 

बुऱ्हाणपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इंदूर-इच्छापूर राज्य महामार्गावर विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला आयशर वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षा ड्रायव्हर सहित चार विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे,

सकाळी ९ वाजेच्या सुमारास आटो रिक्षा ने कॉलेज ला जातं असतांना हनुमान मंदिरा जवळ आयशर (HR 55 HJ 7504) ने आटो ला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्याचबरोबर इतर जखमींनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी बंबरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.