घरपट्टी माफीचा निर्णय शासनाच्या आदेशानंतरच; आयुक्त डॉ. वर्षा गायकवाड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील ३०० चौरस फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाने मजूर दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे सद्यस्थितीत कोणतीही माफी नाही, नागरिकांनी घरपट्टी नियमित भरावी. असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Dr. Varsha Gaikwad) यांनी केले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात ३०० चौरस फुटाच्या २३ हजार ७३३ मिळकती आहे. त्यांच्याकडे चालू मागणी चार कोटी ५१ लाख ७४७ हजारांची आहे. मागितलं थकबाकीसह २१७ कोटी मागील थकबाकीसह २१७ कोटी १० लाख ९ हजार २४७ रूपयांची मागणी आहे. तर सात हजार सातशे चाळीस मिळकतधारकांकडे पाणी कनेक्शन आहे.

त्यांच्या चालू व मागील बाकीसह ३४ कोटी ४४ लाख १ हजार ८३० रुपयांची मागणी आहे. साधारण पाणीपट्टी व घरपट्टी मिळून दरवर्षी ५ कोटी ८५ लाख ५७ हजाराची मागणी असते.

मंजूरी आल्यानंतरच त्याची अमंलबजावणी करण्यात येईल. तोपर्यंत ३०० चौरसफुट क्षेत्रफळ असलेल्या कोणत्याही मालमत्तेस करमाफी नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कराचा भरणा नियमीत करावा. अन्यथा मासिक दोन टक्के प्रमाणे दंड आकारणी करण्यात येईल, असा ईशाराही आयुक्त डॉ. गायकवाड यांनी दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.