डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

0

जळगाव ;- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून रूग्णांना आरोग्य लाभत असून महात्मा फूले जनआरोग्य योजनेचा लाभ थेट मिळवून दिला जात आहे.

कर्करोग, मुत्ररोग, अस्थीरोग मणकेविकार, हर्निया, अपेन्डीक्स,मुतखडा, मेंदू, कान,नाक,घसा,स्त्रीरोग, बालरोग, तसेच जनरल सर्जरी विभागामार्फेत विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनची टीम तपासणी व शस्त्रक्रिया करत आहे. हर्निया,अपेन्डीक्स, मुतखडा, प्रोस्टेट, मणक्याच्या,गुडघ्याच्या लिगामेंट, सांधा,वेडेवाकडे हातपाय, मेंदूतील गाठी, गर्भपिशवी, नाकाचे कानाचे सडलेले हाड, मुखाचा, तोंडाचा व इतर प्रकारचे सर्व कँन्सर शस्त्रक्रिया या अभियानातून केल्या जात आहे. पहिल्याच दिवशी ५५ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले असून १० रूग्णांवर शस्त्रक्रिया देखिल करण्यात आलेल्या आहे.विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांकडून या रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. रूग्णांना थेट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ तर मिळवून दिलाच जात आहे. पण ग्रामीण भागात जावून तज्ञ डॉक्टर तपासणी करून शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रूग्णांना वाहनातूनच दाखल करून घेत पुढील तपासणी रूग्णालयात केली जात आहे. यामूळे एक प्रकारे जिल्हयात रूग्णांच्या जिवनात आरोग्य लाभत असून अनेक रूग्णांनी या उपक्रमाचे व रूग्णालयातील सेवेचे कौतुक केले आहे.

मोफत त्वचा विकार तपासणी शिबिर
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे दि २७ ते ३० फक्‍त चार दिवस मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात इसब,गजकर्ण,जूनाट खाज, अ‍ॅलर्जी,तिळ, मस, चेह—यावरील डाग, टॅटु,कुरूप आणि चामखिळ या आजारांची मोफत तपासणी प्रसिध्द त्वचरोग तज्ञ डॉ. पंकज तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश कुलाल, डॉ. चेतना शंकलेशा, डॉ. सारा खान,. डॉ. सागरिका धवन, त्वचारोग तज्ञांची टीम करणार आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसार अंगावरील टॅटू काढुन टाकणे, जन्मजात खुणा, काळे तीळ काढुन टाकणे आणि त्वचेला उजळवणे उपचारासाठी क्यू स्वीच एनडीयाग लेझर ही आधुनिक मशिन उपचारासाठी उपलब्ध आहे. तर लाँग पल्स एनडीयाग लेझर या मशिनच्या सहाय्याने अंगावरील नको असलेले केस काढता येणार आहे. तसेच सीओ२ लेझर मशिनद्वारे मुरूमानंतरचे व्रण, खड्डे, काळे डाग, कांजण्यानंतरचे डाग, मस काढणे, स्कीन लेझर रिजुव्हीनेशन हे उपचार केले जाणार आहेत. महिला रूग्णांसाठी या क्लिनीकमध्ये स्वतंत्र महिला डॉक्टरकडून उपचार केले जाणार आहेत. हे सर्व उपचार हे सवलतीच्या दरात करण्यात येणार असून गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्वचारोग तज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. दिनेश कुलाल ८४५९३९४८१३ यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.