डॉ.पाकीजा पटेल यांचा अभिनव उपक्रम… सर्वत्र कौतुक…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोहाडी. ता-पाचोरा. जि-जळगाव येथे सी. आर (CR) व एल.आर. (LR) यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. निवडणूक लोकशाही पद्धतीने कशाप्रकारे घेतली जाते याची प्रचिती प्रात्यक्षिक स्वरुपात मुलांना या उपक्रमातून करून देण्यात आली. मुलांकडून उमेदवारी अर्ज भरून, नंतर अर्जाची तपासणी होऊन मुलांना चिन्ह देखील वाटप करण्यात आले. मतदानासाठी अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस अशा विविध भूमिका पार पाडल्या.

विद्यार्थी रांगेत मतदानासाठी उभे राहिले. मतदान अधिकार्‍याकडे आपले नाव सांगून ओळखीचा पुरावा दाखवून मतपत्रिका घेऊन तसेच डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदान करण्यासाठी मतदान कक्षात जाऊन आपले मत मतदान पेटीत टाकले. या निवडणुकीत सी.आर पदासाठी एकूण तीन उमेदवार तर, एल.आर पदासाठी पाच मुली उमेदवार म्हणून उभ्या होत्या. या चुरशीच्या लढतीत मुलांनी दोन दिवस प्रचारानंतर दि. 25 जुलै 2022 रोजी मतदान केले. सी.आर म्हणून फरदीन मुस्ताक खाटीक हा विद्यार्थी तर, एल.आर म्हणून सोनम बाळू भिल हि विद्यार्थिनी विजयी झाली.

या उपक्रमाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मा. सरपंच रामचंद्र महादू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अप्पा कोंडू नाईक, आकाश भिल या सदस्यांनी मोठ्या उत्सुकतेने हजेरी लावली. या उपक्रमाला मुख्याध्यापक जगदीश पाटील व पदवीधर शिक्षक सोमनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल यांनी मांडली व यशस्वीरित्या राबविली या उपक्रमाचे मोहाडी गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.