घरातील मुलांवर वडीलधारी मंडळीनी संस्कार द्यावे  – डॉ. पदमचंद्र मुनी

0

 

[] प्रवचन सारांश- 20.08.2022 []

 

लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो भविष्यात चांगला माणूस नक्कीच घडेल. घरातील वडील मंडळी देखील लहान  मुलांसमोर संस्काराने वागली पाहिजे… कारण  लहान मुले मोठ्या व्यक्तींचे अनुकरण करत असतात. कुठलेही मुल हे जन्मत: निरागस असते परंतु त्याचबरोबर ते अनुकरण करणारे असते असे विचार पूज्य डॉ.  पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनात सांगितले. या सोबत अंतगडदशा सूत्र वाचनात अर्जुन माळी याच्या दररोज 5 पुरुष 1 स्त्रीची  सतत 5 महिने हत्या करणारा क्रूर याला  सद्वर्तन करणार्‍या व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाले व  त्याच्यात कसा बदल घडवून आणला जातो या बाबत देखील प्रवचनात सांगण्यात आले.

चांगला व्यक्ती होण्यासाठी  पालकांचे संस्कार मोलाचे ठरतात.

आजकाल मोबाइल व तत्सम साधनांमुळे पालक व पाल्य यांमधील संवाद कमी होत आहे,तर पालकांनी स्वत: मोबाईल पासुन दिवसातला काही काळ दूर राहुन मुलांशी मोकळे पणाने बोलावे.

मुलांना मैदानी खेळ खेळु द्यावेत याने त्यांच्यातील ऊर्जा वापरली जाते, संघभावना निर्माण होते व हार-जीत याची सवय लागते. मुलांशी संवाद साधताना त्यांना आपल्या आजुबाजुला घडणार्‍या घटनांवर चर्चा करावी व त्याबद्दल त्यांचे मत विचारावे अशा छोट्याश्या गोष्ट मधून मुलाला शिकवू शकतो याबाबत प्रवचनात सांगितले.

अर्जुन माळी पाच महिने आणि 13 दिवसात दर दिवशी एक महिला व पाच पुरुषांना मारून टाकत असे. त्याने 1141 जणांचा मृत्यू  दिला. परंतु अभयमूर्ति सुदर्शन श्रावक दृढ़तापूर्ण अर्जुन माळीच्या सामोरे जातात. उन्मत्त हत्तीप्रमाणे  श्रेष्ठी सुदर्शन यांच्यावर चाल करून आला. तो  आपल्याकडे येतो आहे  हे पाहून सागारी संथारा करत, ध्यानस्थ झाले. अर्जुनने मुद्गर फिरवून श्रेष्ठी सुदर्शनला ललकारले, पण श्रेष्ठी ध्यानमुद्रा मध्ये होते. एका बाजूने हिंसा, आसुरी शक्ति तर रूपेण  दुसरीकडे अहिंसा दैवी शक्तिचे तेज झळकत होते. दैवी शक्ति प्रभावी ठरली. आसुरी शक्ति पराजित झाली. यक्ष सुदर्शनचे आध्यात्मिक दिव्य तेज को सहन करू शकला नाही. अर्जुनच्या शरीरातून यक्ष  निघून गेला. अर्जुन जणू निष्प्राण झाडाप्रमाणे झाला. त्याने तप आराधना केली.  इतकेच नव्हे दीक्षा घेतली साधू बनला शेवटी त्याचा मोक्ष पद मिळाले. सुदर्शन श्रावक त्याच्या जीवनात आले आणि चांगले काही घडले. तुमच्या ही जीवनात चांगले घडो व पर्युषण पर्वाचे पुण्य तुम्हाला प्राप्त होवो असे शुभ चिंतन प्रवचनातून केले.

 

||  संवत्सरी महापर्व – 2022  ||

 

जयगच्छाधिपति 12 वें पट्टधर, व्याख्यान वाचस्पती, आशुकवी आचार्य प्रवर 1008 प.पु. श्री पार्श्वचंद्रजी म.सा., एस.एस. जैन समणी मार्ग के प्रारम्भकर्ता, प्रवचन प्रभावक डॉ प पु श्री पदमचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात स्वाधाय भवन येथे चातुर्मास सुरू आहे.

 

संवत्सरी महापर्व बुधवार, 31 ऑगस्ट 2022 ला संवत्सरी निमित्त पुढील धार्मिक कार्यक्रम होणार आहेत…

 

~  अंतगड सुत्र वाचन सकाळी 8.25 ते 9.30

~  प्रवचन –  9.30 ते 10.30

~  तपस्या प्रत्याख्यान व तपस्वी सन्मान

सकाळी 10.30 से 11.30

~  आलोयणा 11.30 से 12.30

~  प्रवचन व धर्मचर्चा दुपारी 12.30 से 4.00

~  संवत्सरिक प्रतिक्रमण (संध्याकाळ 6.30 नंतर)

कृपया सहपरिवार, दर्शन, वंदन, प्रवचन, धर्मचर्चा, तप – जप, संवर, प्रतिक्रमण, पौषध का यथा संभव धार्मिक बाबींचा लाभ घ्यावा.

 

—————————–

 

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.