डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारिंच्या कार्यक्रमातील १३ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

ज्येष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारींना (Dr. Appasaheb Dharmadhikari) काल ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने ‘ सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला असंख्य लोकांची उपस्थिती होती. त्याच संदर्भात मोट्ठी बातमी समोर येत आहे. या कार्यक्रमाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. या कार्यक्रमात उपस्थिती लावणाऱ्या अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा (Heat Stroke) फटका बसला आहे. अनेक श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 13 श्रीवसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात येते आहे. असं असताना मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात आलं होतं, नेमक्या काय-काय सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली, याबाबत माहिती दिली.

“प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. आप्पासाहेबांना बघता यावं यासाठी अनेक श्रीसेवक 14 तारखेपासून यायला सुरुवात झाली होती. ते ज्या श्रद्धेने आणि आस्थेने आले होते ते पाहता त्यांना थांबवणं आणि रोखणं बरोबर नव्हतं. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.