हादरवणारी बातमी; निष्काळजीपणामुळे गेला चिमुकलीचा जीव…

0

 

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

बीड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेकअप आरसा अंगावर पडल्याने गळ्यात काच घुसून पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बीडच्या गेवराई तालुक्यातील खेरडावाडी गावात मेकअप चा आरसा अंगावर पडल्याने गळ्यात काच घुसून पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोही गोपाल भिसे, असे चिमुकलीचे नाव आहे. पाच वर्षाची चिमुरडी घरात खेळत होती. यावेळी बाकीचे घरातली लोक इतर कामात व्यस्त होते. मात्र, खेळता खेळता सोफ्यावर चढून बांगड्या ठेवताना हातातल्या बांगड्या मेकअप आरश्याच्या हुकात गुंतल्या आणि यावेळी चिमुरडी सोफ्यावर असताना तिचा पाय निसटला आणि आरसा अंगावर पडला. यावेळी चिमुरडीचा आवाज ऐकून घरातील सर्व जण खोलीकडे पळाले. यावेळी तेथील भयावह दृश्य पाहताना घरातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरशाच्या काचांचे तुकडे सर्वत्र झालेले होते आणि  काचाचा एक तुकडा पाच वर्षाच्या आरोहीच्या गळ्यात घुसलेला होता. त्यांनी तो तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी घटनेनंतर एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.