केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा गोड बातमी… जाणून घ्या नेमकं काय ते !

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) पुन्हा एकदा गोड बातमी येत आहे. बातमी खूपच महत्वाची आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार यावेळीही केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

येत्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि त्याला सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर त्याचा महागाई भत्ता 46 टक्के झाला तर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 8,280 रुपये होईल. अशाप्रकारे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारात 720 रुपयांची (वार्षिक 8640 रुपये) वाढ होईल.

केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांच्या वाढीची घोषणा केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के झाला. ही वाढ सरकारने 1 जानेवारीपासून लागू केली आहे. आता पुढील महगाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के आहे. जर यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली तर 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पण याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.