भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या डेअरीवर छापा

0

जळगाव: ;– सण उत्सवाच्या अनुषंगाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना चाप बसवा, यासाठी जिल्ह्यास्तरी समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी गुजराल पेट्रोल पंप परिसरातील श्री. द्वारकेश डेअरीवर छापा टाकून भेसळयुक्त १२० लिटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच अन्य पदार्थाचे नमूने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यात दूधासह दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्हास्तरीय समिती तयार केली आहे. या समीतीचे अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन हे आहे. या समितीने दोन दिवसांपुर्वी भुसावळ येथे छापा टाकून तेथून पाच टन बनावट खवा जप्त केला होता. त्याअनुषंगाने जिल्हाभरात उद्योजकांसह विक्रेत्यांवर धडक मोहीम राबविण्याचे

आदेश समितीला देण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक अनंत पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी तथा सहाय्यक निबंधक वासुदेव पाटील, रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पशूसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. भांडारकर, पोलीस कर्मचारी प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने शहरातील गुजराल पेट्रोलपंप समोरील श्री. द्वारकेश डेअरीवर छापा टाकला. याठिकाणी १२० लिटर दूध नष्ट करण्यात आले. तर अन्न व औषध प्रशासनाने दूध, खवा आणि पनीर याचे नमूने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.

भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची विक्री होणाऱ्या पदार्थांवर वापराच्या पॅकीट किंवा डब्ब्यावर मुदतीचा दिनांक असणे आवश्यक आहे. समितीने केलेल्या तपासणीत आढळून आल्यास संबंधितावर जिल्हास्तरीय समितीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.