ब्रेकिंग : अमेरिकेतील देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. एका तांत्रिक बिघाडाने सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. फेडरल एव्हिएशनच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अमेरिकेत अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
https://twitter.com/flyLAXairport/header_photo
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसकडून देखील यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जनसंपर्क सचिव कैरीन जीन पियरे यांनी सांगितले की, दळणवळण विभागाचे सचिव काही वेळापूर्वीच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटले आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटाबाबत त्यांनी अध्यक्षांना अवगत केलं आहे.

एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये नोटम सिस्टीम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही यंत्रणा पायलट्सना संभाव्य धोका किंवा विमानतळ धावपट्टी सुविधा सेवांमध्ये बदल आणि उड्डाण दरम्यान संबंधित प्रक्रियेत बदल झाल्यास त्याची माहिती देते. फेडरल एव्हिएशनने सांगितले की, तांत्रिक बिघाडानंतर ‘नोटिस टू एअर मिशन’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये एका विशिष्ट हवाई क्षेत्रातील विमान सेवा रद्द केली जाते. ही सूचना एखाद्या क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळेस अथवा लष्करी हवाई उपकरणाच्या चाचणी दरम्यान जारी केले जाते.

यंत्रणेत बिघाड झाल्याने विमान कंपनी आणि ग्राउंड क्रूजवळ लँडिंग आणि इतर संबंधित माहिती अपडेट होत नाही. त्यामुळे विमान सेवा विस्कळीत झाली. जवळपास 1200 हून अधिक विमानांनी उशिराने उड्डाणे घेतली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.