लोकशाही न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर – बऱ्हानपुर रोडवर आयशर ट्रक मध्ये गुरांना कोंबून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून गाडी जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आले आहे. परंतु आरटीओ चेक पोस्ट वरून गाडी पास झाली कशी असा प्रश्न गोरक्षकासह नागरिकांना पडला आहे. मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रोडवर काल रात्री ए एम एच 20 इ एल 98 98 क्रमांकाच्या आयशर ट्रक मधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात होती गोरक्षकांनी गाडी अडवत पोलिसांना माहिती दिली.
बऱ्हानपुर रोडवर धाव घेतली असता त्यांना सदर वाहन हे बंद पडलेल्या अवस्थेत लोकांच्या गर्दीने वेडलेले होते यात 16 गुरांना अतिशय दाटीवाटीने वाहून नेले जात असल्याचे दिसून आले या वाहनासोबत शेख अस्लम शेख अकबर वय 24 राहणार बोरगाव तालुका सिल्लोड हा चालक आढळून आला त्याला विचार न केले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली याप्रकरणी शेख अस्लम शेख अकबर वय 24 राहणार बोरगाव तालुका सिल्लोड शेख वजीर शेख नजीर राहणार वाघारी तालुका जामनेर आणि शेख आरिफ शेख नजीर कुरेशी राहणार रसलपुर तालुका रावेर यांच्यावर पोलीस कर्मचारी चंद्रकांत नारायण बोदडे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
Trending
- शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
- दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
- उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
- ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
- राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
- माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
- बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
- किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

