कलश यात्रेने 24 कुंडीय गायत्री महायज्ञ आरंभ

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाळधी येथे दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता कलश यात्रा सुरुवात केली. यात्रेचा मार्ग माळीवाडा, धनगरवाडा ते मारुती मंदिर बस स्टँड मार्ग गायत्री मंदिर या मार्गाने कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत मोठ्या संख्येने कलशधारी मुली व महिला उपस्थित होते. तसेच सं. न. झवर विद्यालयातील विद्यार्थिनी लेझीम नृत्य सादर केले. महिला घोडेस्वार हे कलश यात्रेचे मोठे आकर्षण ठरले. 800 हून अधिक महिला या कलश यात्रेत उपस्थित होत्या. कलश यात्रेत भाविकांसाठी जागोजागी शरबत व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची 24 कुंडीय महायज्ञ स्थळ गायत्री मंदिर या ठिकाणी उपस्थित लाभली. शांतीकुंज हरिद्वार प्रतिनिधी टोलीनायक
विनय केसरी व देवेश शर्मा यांनी गुलाबराव पाटील व माजी उपसरपंच अनिल कासट यांचे तिलक पूजन केले व गायत्री महाविद्यान भेट करण्यात आले.

शांतीकुंज प्रतिनिधी विनय केसरी यांच्या मार्गदर्शनाने 24 गायत्री महायज्ञ पार पडत आहे. तसेच प्रखर प्रज्ञा व सजल श्रद्धा यांचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 12 जानेवारी रोजी 24 कुंडी गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती करण्यात येईल. या यज्ञाचा व प्रसादाचा अनेक भाविक लाभ घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील गायत्री परिवारातील साधक यज्ञाच्या यशस्वी साठी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.