लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील खडकी गावातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेली. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता परंतू कुठेही मिळून आली नाही. याबाबत १० जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यावरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.