चक्क माजी नगरसेवकालाच लावला चुना, ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

0

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आमिष दाखवून लुटण्याचा प्रकार घडत आहे. डोंबिवली (Dombivli) मध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. साधारण माणसाला नाही तर चक्क माजी नगरसेवकाला आमिष दाखवून लुटण्यात आले आहे. गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवल्यानंतर अल्प कालावधीत मोठे रक्कम परत मिळणार! असे सांगून चुना लावण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंटी आणि बबली हे राज्यात अनेक जणांना चुना लावून पसार होत आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal), मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांची फसवणूक मागील वर्षी बंटी-बबलीच्या वेगळ्या जोडीने केली होती. आता डोंबिवलीमधील बंटी-बबलीच्या जोडीने माजी नगरसेवकाची फसवणूक केली आहे.

काय आहे प्रकार

डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकाला बंटी बबलीने २२ लाखांचा चुना लावला आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३५ दिवसांनी ५० हजार रुपये परतावा मिळेल, असे आमिष दाखवत २२ लाखांमध्ये फसवणूक करण्यात आली. डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश माने यांची फसवणूक झाली आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक ३५ दिवसांनी ५० हजार रुपये परतावा मिळेल, असे सांगत ही फसवणूक केली आहे. या जोडीवर सध्या डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.