नेटकऱ्यांनी ‘अनुष्का’ आणि ‘बिग बी’ यांना धरले धारेवर, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यात अनुष्का आणि अमिताभ बच्चन बाइकवरून प्रवास करतांना दिसत आहे. मुंबईची वाहतूक कोंडी जशी सर्वसामान्यांना भेडसावते तशीच सेलिब्रिटींनाही भेडसावते. अनेकदा सेलिब्रिटींना वाहतूक कोंडीचा (Traffic congestion) सामना करावा लागतो. असाच प्रकार काल मुंबईत (Mumbai) आपण पाहिला. बिग बींनी मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि सेटवर लवकर पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली होती. त्याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तर दुसरीकडे अनुष्कासुद्धा बाइकवर एका व्यक्तीच्या मागे बसून हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसली. नेटकऱ्यांनी हेल्मेटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोघांनाही नोटीस बजावली आहे.

अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्माच्या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी हेल्मेटवरून प्रश्न उपस्थित केला. इतकंच नव्हे तर काहींनी कमेंटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांच्याकडे तक्रार केली. यावर मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं, ‘आम्ही ट्रॅफिक शाखेला याबद्दलची माहिती दिली आहे.’ त्याचप्रमाणे त्यांनी दोन्ही कलाकारांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया या दोघानांही मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.