डीएनसी समाजकार्य महाविद्यालयात बाबासाहेबांची जयंती साजरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. शिक्षकेतर कर्मचारी विजय गायकवाड यांनी गौतम बुद्ध यांची वंदना त्रिसरण पंचशील सुत्र गायन करून अभिवादन केले.

कार्यक्रमाप्रसंगी डॉ. यशवंत महाजन, डॉ. उमेश वाणी, डॉ. शाम सोनवणे, डॉ. सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे, डॉ. नितीन बडगुजर, डॉ. योगेश महाजन, डॉ. प्रशांत भोसले, प्रा. जुगल घुगे, कार्यालयीन अधीक्षक धनंजय महाजन, शिक्षकेतर कर्मचारी अमोल पाटील, प्रवीण जोशी, योगेश महाजन कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.