Saturday, January 28, 2023

माजी ग्रामपंचायत सदस्याची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विक्रम लालू भिरूड (वय ५३, रा. डोंगरकठोरा, ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. विक्रम भिरूड हे डोंगरकठोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून ते कुटुंबासह राहतात. त्यांच्यावर कर्जाचे डोंगर असल्याने गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते.

- Advertisement -

बुधवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा शिवारातील सातोद रस्त्यावरील दिलीप भिरूड यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

दरम्यान, पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आत्महत्या करण्यापूर्वी विहीरीच्या काठावर आपला चष्मा, शर्ट व चपल ठेवल्याचे दिसून आले.

गावातील ग्रामस्थांच्या व तरूणाच्या मदतीने अखेर विक्रम भिरूड यांचे मृतदेह विहीरीतुन काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी मयताचे लहान भाऊ सुनिल भिरुड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे