भाऊसौ गुलाबरावजी पाटील विद्यालयात DIY KIDS उपक्रम…

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात “डू इट युवर सेल्फ” या अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रीवर नक्षीकाम केले. मुलांच्या वयोगटानुसार त्यांना काही गोष्टी जमायला हव्यात म्हणून, शाळेच्या कला शिक्षिका के.टी वाघोदे यांनी ही संकल्पना मुख्याध्यापकांना निदर्शनास आणून देऊन ती प्रत्यक्षात शाळेत उतरवली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थाध्यक्ष प्रतापराव पाटील, मुख्याध्यापक डी.डी कंखरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर रंगांची उधळण करून नक्षीकाम केले. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव मिळावा आणि त्यांचा विविधांगी विकास व्हावा म्हणून हा उपक्रम शाळेच्या वतीने घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.