पूर प्रवण जिल्ह्यांत आपत्ती दलाच्या तुकड्या तैनात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. दरड कोसळण्याच्या घटना वाढीस लागत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जूलैपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी 7 ते 6 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई-3,पुणे-2 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-1,नागपूर-1 अशा एकूण 2 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.