प्रत्येक मतदाराला 20 मतांचा अधिकार; जिल्हा दुध संघ निवडणूक….

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने राष्ट्रवादीतील अनेक उमेदवार सर्वपक्षीय पॅनलच्या तंबुत दाखल होण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा दूध संघासाठी उमेदवारी दाखल करण्याची १० नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत आहे. भाजपने शिंदेसेनेच्या स्थानिक आमदारांना सोबत घेवून आधीच सर्वपक्षीय पॅनलची घोषणा केली आहे. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यासाठी राष्ट्रवादीचे पाच ते सहा उमेदवार प्रयत्नशील आहेत. याबाबत मुंबईत बैठकांचे सत्र आटोपले आहे. येत्या रविवारी पॅनल संदर्भात पुन्हा जळगावात बैठक घेतली जाणार आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला सर्वच २० जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिल्हा बँकेच्या तुलनेत अधिक खर्चीक होण्याची भीती असल्याने तुल्यबळ उमेदवार सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रही आहेत.

दूध संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातून तर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सोनल पवार यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. दूध संघासाठी आतापर्यंत केवळ या दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. शुक्रवारी ८५ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी एकुण १६४ अर्ज घेतले आहेत. १० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.